1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. 4 farmers committed suicide in 24 hours while farmers started running

शेतकरी संप सुरु असतांना 24 तासात 4 शेतकऱ्यांची आत्महत्या

4 farmers committed suicide in 24 hours

राज्यात शेतकऱ्याचा संप सुरु असताना गेल्या 24 तासात तब्बल 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. साताऱ्यातील पळशीमधील सुरेश शंकर साबळे यांनी खासगी सावकार आणि बँकेचे कर्ज असल्यानं विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. तर नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर इथं परमेश्वर वानखेडेंनी आत्महत्या केली. दुसरीकडे वर्ध्यातील ब्राह्मणवाड्यात ईश्वर बळीराम इंगळेंनी गळफास घेऊन जीवन संपवलं. याशिवाय येवल्यातल्या पिंपरीमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या अवघ्या 30 वर्षांच्या नवनाथने मृत्यूला कवटाळले आहे.

पुढील लेख
वॉशिंग्टन येथे कॉल सेंटर घोटाळ्यात 4 भारतीय, एक पाकिस्तानी दोषी