गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 एप्रिल 2024 (18:00 IST)

प्रवासी बसची ट्रकला धडक होऊन अपघातात 4 ठार, 34 जखमी

4 killed 34 injured in passenger bus
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एसटी बसची ट्रकला जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एका किशोरवयीन मुला आणि एका महिलेसह चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर 34 प्रवाशी जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 
अपघातग्रस्तबस एसटी महामंडळाची असून मुंबई -आग्रा महामार्गावर जिल्ह्यातील चांदवड शहराजवळ आहेर वस्तीजवळ सकाळी 9:45 च्या सुमारास हा अपघात झाला. 

ही बस जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून नाशिक कडे जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचा डावा भाग ट्रकवर जाऊन आदळला. बसच्या डाव्या बाजूचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर गोंधळ उडाला. 
अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली जखमींना स्थनिकांच्या मदतीने बाहेर काढले आणि रुग्णालयात पाठवले. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. बस मध्ये 45 प्रवाशी असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. 34 प्रवाशी जखमी झाले आहे. 

Edited By- Priya Dixit