1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Accident of ST bus falling from the bridge 30 passengers injured

एसटी बसचा पुलावरून कोसळून अपघात, 30 प्रवासी जखमी

एसटी बसचा अपघात झाल्याची घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यात अकोली  येथे  घडली आहे. या अपघातात 30 प्रवाशी जखमी झाले आहे. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने पुलावरून बस कोसळल्याने हा अपघात झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बस परभणीतील जिंतूर येथून सोलापूरच्या दिशेने जात असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पुलावरून खाली पडली. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

या अपघातात 30 प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींना जिंतूरच्या वैद्यकीय सुविधेत नेण्यात आले नंतर त्यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात रेफर केले. यात काही प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit 
पुढील लेख
विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेतलं, तरुणीचा मृत्यू