शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (09:35 IST)

मेळघाटात 3 महिन्यांत 49 बालमृत्यू

मेळघाटात एप्रिल ते जून या तीन महिन्यांत सहा वर्षांपर्यंतच्या तब्बल 49 बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्यात 29 दिवस ते 1 वर्षांपर्यंतच्या 17 बालकांचा समावेश आहे. 
 
मेळघाटात गेल्या वर्षी एप्रिलपासून ते यंदा मार्चपर्यंत 6 वर्षांपर्यंतचे 213 बालमृत्यू झाले. उपजत मृत्यूंची संख्या 113, तर 10 मातामृत्यू झाले आहेत. यातील 130 बालमृत्यू हे शून्य ते एक वर्षांच्या बालकांचे आहेत. शून्य ते सात दिवसांच्या 81 बालकांचा मृत्यू झाला.
 
जोखमीच्या क्षणी बाळांना बालरोगतज्ज्ञांनी घरोघरी जाऊन तपासणी करून आरोग्य सेवा पुरवणं, तसंच प्रसूतितज्ज्ञांनीही घरांत जाऊन तपासणी करणं आवश्यक असल्याचं स्वयंसेवी संस्थांचं म्हणणं आहे.