सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 जानेवारी 2025 (10:41 IST)

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची भरपाई, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Devendra Fadnavis
Bhandara Ordnance Factory Blast News:  शुक्रवारी सकाळी भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट झाला, ज्यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 10 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे.   
मिळालेल्या माहितीनुसार हा स्फोट आतापर्यंतचा सर्वात मोठा स्फोट मानला जात आहे, ज्यासाठी भरपाई जाहीर करण्यात आली आहे. जवाहर नगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथील एलटीपीई विभागात शुक्रवारी सकाळी मोठा स्फोट झाला. इमारत क्रमांक 23 मध्ये झालेल्या या अपघातात 3 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 10 जण गंभीर जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे.तसेच स्फोटाचे कारण अजून समोर आलेले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. यानंतर, भंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना देवेंद्र फडणवीस यांनी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

Edited By- Dhanashri Naik