सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2024 (09:40 IST)

भरधाव कार कॅनॉल मध्ये कोसळुन एकाच कुटुंबातील 6 जण ठार

Accident
सांगली जिल्ह्यात तासगाव- मणेराजुरी मार्गावर भरधाव कार कॅनॉल मध्ये कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.तर एक महिला गंभीररित्या जखमी  झाल्याची घटना मंगळवारी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास घडली आहे.  राजेंद्र पाटील, राजराम पाटील, सुजाता राजेंद्र पाटील, राजीव विकास पाटील ( वय 2 ), प्रियांका खराडे, आणि ध्रुवा पाटील अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहे. 

तासगावात राहणारे राजेंद्र पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यात कोकळे गावात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. वाढदिवस साजरा करून परत येताना त्यांची अल्टो कार तासगाव मणेराजुरी महामार्गावर चिंचणी जवळ कोसळून कॅनॉल मध्ये पडली या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. हा अपघात सकाळी उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह वाहनातून काढले. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. या अपघातामुळे खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit