गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 जानेवारी 2022 (10:37 IST)

61 वर्षीय सावकाराने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

कोल्हापुरातील हातकणंगलेतील दर्गा चौक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या एका 61 वर्षीय नराधम सावकाराने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या सावकाराने त्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला या मुळे ती गरोदर राहिली. यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. या आरोपीचे नाव नंदकुमार चंद्रकांत निगवे असे आहे. या आरोपीने मुलीच्या इच्छेविरुद्ध आपल्या पत्राच्या  शेडमध्ये तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या मुळे ती गर्भवती झाली आणि तिच्यावर उपचार सुरु होते. नंतर पीडित मुलीने एका मुलीला जन्म दिला. तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर लैंगिक अत्याचाराची तक्रार हातकणंगले पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी आरोपी नंदकुमार याला अटक केले आहे. नंदकुमार सावकार असून त्याच्यावर सावकारीतून अनेक घोटाळे केल्याचा आरोप ही केला जात आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले. नायायालयाने त्याला 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे.