1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (21:53 IST)

आयोगाची खात्री पटली आहे की देशात करोना नष्ट झाला आहे, राऊत यांनी खोचक शब्दांत टीका

पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यावर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. “पूर्ण तयारीनिशीच हा निर्णय घेतला आहे. निवडणुका वेळेत होणं गरजेचं आहे. आयोगाची खात्री पटली आहे की देशात करोना नष्ट झाला आहे. जाहीर सभांमधून तो वाढणार नाही”, असं राऊत म्हणाले आहेत.
“निवडणूक आयोगाने जाहीर सभांवर, प्रचारावर, मिरवणुकांवर बंधनं घातली आहेत. ती बंधनं सर्वांसाठी असावीत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत आम्ही ते पाहिलं आहे. दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना सगळ्याच राजकीय पक्षांनी त्या लाटेवर आरूढ होऊन कसे प्रचार केले. सत्ताधारी पक्षांनी, पंतप्रधानांनी, प्रमुख नेत्यांनी मोठ्या सभा घेऊ नयेत. पंतप्रधानांनी तर आदर्श घालून दिला पाहिजे. नियमाचं पालनं केलं पाहिजे. पंजाबमध्ये जो प्रकार घडला, त्यानंतर आम्हाला त्यांची चिंता वाटते. लोकांचीही करोनामुळे चिंता वाटते”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.