बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (17:03 IST)

राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट

राज्याच्या काही भागांत 7 ते 10 जानेवारी या कालावधीत पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस, तर विदर्भात काही भागांत गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आह़े. राज्यात थंडीने तूर्त विश्रांती घेतली असून, रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. रात्री हलका गारवा असला, तरी कोणत्याही भागांत कडाक्याची थंडी नाही. अंशत: ढगाळ वातावरणामुळे दिवसाचे कमाल तापमान मात्र सरासरीखाली आले आहे. 10 जानेवारीपर्यंत रात्रीच्या तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. याच कालावधीत राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
मुंबईत सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याचं दिसून येत असताना सकाळी 10 ते 11 च्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पश्चिम उपनगरात अंधेरी गोरेगाव, कुर्ल्याच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी तर पावसानं जोरदार हजेरी लावली.