रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:43 IST)

महाराष्ट्रात ऑक्सिजनची मागणी वाढली

मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातील काही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता, त्याच्या परिणाम राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली असल्याचे समोर येत आहे. राज्यात सध्या दररोज 424 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. हीच मागणी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत  दिवसाला 270 ते 300 मेट्रिक टनची आवश्यकता होती. ऑक्सिजनची मागणी वाढली असली तरी राज्यात पुरेसा साठा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 
 
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. पहिल्या लाटेत दिवसाला 850 मेट्रिक टन इतकी ऑक्सिजनची मागणी होती, दुसऱ्या लाटेतही ऑक्सिजनची मागणी वाढली होती. कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी इतर राज्यांतून ऑक्सिजन मागवावा लागला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान राज्यात ऑक्सिजन उत्पादन करणारे प्लांटही उभारण्यात आले, त्यामुळे राज्याकडे पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे