सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:43 IST)

भाजप आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी

ashish shelar
मुंबई: माजी मंत्री आणि भाजपचे (BJP) प्रमुख नेते आमदार आशिष यांना दोन दिवसांपूर्वी फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आशिष शेलार यांनी याप्रकरणी पत्र लिहून पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. आशिष शेलार यांना यापूर्वी देखील अशी धमकी देण्यात आली होती, अशी माहिती आहे.   
दोन वेगवेगळ्या फोन वरुन धमकी
आशिष शेलार यांनी अनोळखी नंबरच्या फोनवरुन धमकी आल्याची माहिती पत्राद्वारे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दोन वेगवेगळ्या फोन वरुन आशिष शेलार यांना धमकी देण्यात आल्याचं देखील कळतंय. भाजप नेते आशिष शेलार यांनी अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दोन वेगवेगळ्या फोनवरुन देण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल
आशिष शेलार यांना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच परवाच्या दिवशी धमकी देण्यात आली होती. आशिष शेलार यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस  आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार केल्याचं कळतंय.
आज गृहमंत्र्यांकडे करणार तक्रार
आशिष शेलार हे भाजपचे प्रमुख नेते असून त्यांना यापूर्वी देखील धमकी मिळाली होती. शेलार आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून झालेल्या प्रकाराची माहिती देतील आणि कारवाई कऱण्याची मागणी करतील, असं देखील कळतंय.