धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढण्याची भाषा करणाऱ्या करुणा मुंडे यांचे नगरमध्ये घुमजाव म्हणाल्या…..
अलीकडेच शिवशक्ती सेना या आपल्या नव्या पक्षाची घोषणा करताना करुणा शर्मा-मुंडे यांनी वेळ पडल्यास आपले पती मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा नगरमध्ये केली होती. मात्र, आज
महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात संगमनेरमधून करताना त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला आहे. आपण स्वत: कधीही कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे त्या म्हणाल्या. तसेच आपल्या मुलालाही आपण राजकारणात आणणार नाही, मात्र भविष्यात त्याची इच्छा असेल तर मी अडविणार नाही, असेही त्या म्हणाल्या.करुणा मुंडे यांनी गेल्या महिन्यात नगरमध्ये शिवशक्ती सेना या नव्या पक्षाची घोषणा केली होती. ३० जानेवारी २०२२ रोजी
नगरमध्ये मेळावा घेऊन पक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. गरज पडल्यास बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या विधानसभा मतदारसंघातून आपले पती धनंजय मुंडे यांच्या विरोधातही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.
आज त्या संगमनेरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या या भूमिकेत बदल केला. आपण स्वत: कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याचे त्या म्हणाल्या. याशिवाय आपल्या मुलालाही आपण आताच राजकारणात आणणार नाही. मात्र शेवटी त्याच्या अंगातही राजकारण्याचे रक्त आहे. त्यामुळे भविष्यात त्याला वाटले तर तो राजकारणात येऊ शकतो. तेव्हा मी त्याला अडविणार नाही. मी त्याची आई आहे, मालकीण होऊ उच्छित नाही, असेही त्या म्हणाल्या.