सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 8 जानेवारी 2022 (18:36 IST)

जन्मदात्या पित्यानेच 6 वर्षाच्या चिमुकलीला गळफास दिला, पिताला अटक

बाप आणि लेकीचं नातं काही वेगळंच असतं. असं म्हणतात की बापाला सर्वात जवळची कोणी असते ती लेक असते. पण बाप आपल्या पोटच्या मुलीचा मारेकरी असू शकतो हे धक्कादायकच आहे. असेच काही घडले आहे. नाशिक येथे. एका जन्मदाता पित्यानेच आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीला गळफास देऊन जंगलात फेकण्याचा प्रकार घडला आहे. राम माधव धनगरे असे या बापाचे नाव आहे. 
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात देहरेवाडी परिसरात काही लोकांना निर्जनस्थळी ही चिमुकली एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली .हिची अशी अवस्था कोणी केली हा प्रश्न उभा राहिला. या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्यामुळे तिचे प्राण वाचले. नंतर जन्मदात्या पित्यानेच मुलीच्या अपहरणाचा बनाव रचून तिला ठार मारण्याचे उघडकीस आले. ही मुलगी आरोपी रामच्या पहिल्या पत्नीपासून झालेली होती. पण रामच्या दुसऱ्या पत्नीला ती नकोशी झाल्यामुळे पती पत्नीच्या मध्ये दररोज वाद होत होते. दररोजच्या वादाला कंटाळून आणि पत्नीच्या सांगण्यावरून आपल्या पोटच्या मुलीला गळफास देऊन संपविण्याचा प्रयत्न केला. या साठी आरोपीने मुलीला दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडीच्या जंगलात आणले होते. तिथे त्याला मुलीला फासावर लट्कवत असताना गुरख्यानी पहिले आणि जोरात ओरडले. हे ऐकून बापाने मुलीला त्याच अवस्थेत सोडून पळ काढला. त्यामुळे त्या चिमुकलीचा जीव वाचला. या प्रकरणाच्या आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या पत्नीच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले. पोलीस अधिक तपास करीत आहे.