गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (11:08 IST)

बेळगावात भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू

7 killed in Belgaum wall collapse
रात्री झालेल्या मुसळधार पावसात मोठी दुर्घटना घडली आहे ज्यात घराची भिंत कोसळ्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगावच्या बादल अंकलगी गावात बुधवारी रात्री साधारणत: 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. 
 
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत घटनास्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतकांमध्ये दोन आठ वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे.
 
मृत्यू झालेले सर्वच्या सर्व सातही जण हे एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.