शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (22:43 IST)

पुन्हा एकदा भाजपावरच जनतेनं विश्वास दाखवला : फडणवीस

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. भाजपाची स्पेस या निवडणुकीत वाढल्याची प्रतिक्रिया राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 
 
या निवडणुकांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. “या निवडणुकीत भाजपानं निर्णय घेतला होता की आमचं स्थानिक नेतृत्व ती निवडणूक लढेल. आम्ही कुणीही प्रचाराला गेलो नाही. तरी जनतेनं सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला निवडून दिलं आहे. २२५ जागांपैकी ५५ जागा म्हणजे २५ टक्के जागा भाजपाला मिळाल्या आहेत. २५ टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्या आहेत. आणि तीन पक्ष एकत्र येऊनही उरलेल्या ५० टक्क्यात ते ३ पक्ष अडकले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात ज्यांची सत्ता आहे, दुर्दैवाने तो शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकाचा पक्ष झालाय. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपावरच जनतेनं विश्वास दाखवला आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
 
नागपूरमध्ये आमच्या ४ जागा होत्या, त्या ३ झाल्या. पण जिल्हा परिषदेत जागा कमी झाल्या असल्या, तरी पंचायत समित्यांमध्ये आमच्या ४ जागा जास्त आल्या आहेत. त्यामुळे एकूणच या निवडणुकीकडे बघितलं तर पुन्हा एकदा भाजपाची स्पेस वाढतेय आणि या तीन पक्षांची स्पेस कमी होतेय, हे लक्षात येईल. त्यातही शिवसेना अधिक खाली जातेय, हे त्यातून स्पष्ट होतंय”, असं ते म्हणाले.