1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (22:00 IST)

अप्रत्य़क्षपणे महाराष्ट्र सरकार ड्रगमाफियांचे समर्थन करत आहे

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी नसून भाजपाचेच लोक असल्याचा आरोपही त्यांनी या पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या या आरोपावर भाजपा आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
कदम म्हणाले, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी साहसाने कारवाई करत ड्रग्ससहीत काही लोकांना रंगेहाथ पकडलं. देशभरातून त्यांचं कौतुक होत असताना राज्य सरकारचे मंत्री पत्रकार परिषद घेऊन ही कारवाई ढोंग असल्याचं सांगत या अधिकाऱ्यांचा अपमान करतात. जे अधिकारी कारवाई करतात ते ढोंगी पण जे ड्रगमाफिया आहेत ते चांगले. काय म्हणायचंय काय? महाराष्ट्र सरकारची मती गेलीये कुठे? ड्रग माफिया या तीन पक्षांच्या सरकारचे कोण लागतात? हे तुमचे घरजावई आहेत का?
 
ते पुढे म्हणाले, अप्रत्य़क्षपणे महाराष्ट्र सरकार ड्रगमाफियांचे समर्थन करत आहेत. का मागे आम्ही पाहिली तशी कोट्यवधी रुपयांची वसुली या ड्रगमाफियांकडून सरकार करत आहे? याची उत्तरं सरकारला द्या वी लागतील. राजकारणात खाली पडाल पण किती पडाल यालाही मर्यादा हव्यात.