गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (09:21 IST)

वर्ध्यात कारच्या भीषण अपघातात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू

7 students killed in car accident in Wardha  वर्ध्यात कारच्या  भीषण अपघातात 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू Marathi Regional News
वर्ध्यातील सेलसुरा येथे चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
 
सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे हे सर्व विद्यार्थी होते. परीक्षा संपल्यानंतर देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला.

चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे. या अपघातात मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी सावंगी येथील मेडिकल कॉलेज चे विद्यार्थी आहे. अपघतात दगावलेल्या मृतकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहेत.