सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (08:46 IST)

कोण कोणामुळे वाढले?; संजय राऊतांचा भाजपाला चिमटा

शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत भाजपला जोरदार टोला हाणलाय. राऊतांच्या या ट्वीटवरुन राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
 
संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. या व्यंगचित्रात बाळासाहेब ठाकरे एका चित्रावर बसले असून त्यांनी दुसऱ्या खुर्चीवर पाय ठेवले आहे. तसंच बाजूला एक स्टूलही आहे. त्यावेळी तिथे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन उभे असतात. बाळासाहेब त्यांना ‘Have a Seat’ म्हणून बसण्यास सांगतात. असं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलंय. हे व्यंगचित्र शेअर करताना ‘कोण कुणामुळे वाढले? उघडा डोळे.. बघा नीट’ असं कॅप्शन दिलं आहे.