बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (08:16 IST)

ऑनलाईन शिक्षणसाठी मोबाईल नसल्यामुळे विद्यार्थींनीने केली आत्महत्या

सुरगाणा –  महाविद्यालये सुरु होण्यापूर्वीच पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळा अलंगुण येथे ११ वी विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थ्यीनी भारती तुकाराम चौधरी वय १७ रा.हातरूडी हिने आत्महत्या केली. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र आजपासून पहिले ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु होणार होते. तिचे काका हिरामण चौधरी यांनी सांगितले की, कोरोनामुळे एक ते दीड वर्षापासून शाळा बंदच असल्याने ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी अन्ड्राईड मोबाईल नाही पुरेसे नेटवर्क पण उपलब्ध नाही मोबाईल घेण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती नाही तसेच सारखे घरी राहून कंटाळली होती. आदी कारणांमुळे नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केली असल्याचे त्यांनी सांगितले. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.