गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मार्च 2023 (21:35 IST)

लग्न करण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या ठगास 7 वर्षे कारावास व 1 लाख रुपये दंड

jail
नाशिक :- लग्न करण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या ठगास 7 वर्षे कारावास व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, यशवर्धन सुरेश देशमुख पाटील नामक इसमाने पीडित महिलेशी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून ओळख केली. नंतर त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. त्याने नाशिक येथे येऊन पीडित महिलेच्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम देखील केला होता. त्यावेळी त्याने तो इंडियन ऑईल कंपनीत मोठया हुद्द्यावर नोकरीस असल्याचे तसेच त्याचा पाषाण रोड, पुणे येथे स्वत:च्या मालकीचा पेट्रोल पंप असल्याचे पीडित महिलेला व तिच्या नातेवाईकांना सांगितले होते.
 
त्यानंतर यशवर्धनने पीडित महिलेला तो दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टवर ट्रस्टी असल्याचे सांगून ट्रस्टतर्फे लिलाव करण्यात येणारे सोने त्यांच्या लग्नासाठी स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष तिला दाखविले. त्याने तिच्याकडून व तिच्या बहिणीकडून १,००,६०० रुपये घेतले. व त्याने सोनेही दिले नाही. त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रतिक पाटील यांच्याकडे होता.
 
पाटील यांनी गुन्हयाचा तपास करत असताना आरोपीचा फोटो व त्याने फिर्यादी यांना संपर्क करण्याकरिता वापरलेले ३ बंद मोबाईल क्रमांक बंद लागत होते. फारसा पुरावा उपलब्ध आरोपाने सांगितलेले नाव व ओळख देखील खोटो असल्याचे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टकडुन कळविण्यात आले होते. त्याचप्रमाणे सदरचा आरोपी हा अत्यंत चलाखीने वारंवार स्वतःचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक बदलत असल्याने त्याचा माग काढणे अत्यंत जिकीरी झालेले होते.
 
सपोनि प्रतिक पाटील व त्यांच्या तपास पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन आरोपी यशवर्धन याने पूर्वी वापरलेले मोबाईल क्रमांक, तो परत असलेल्या बँक खात्यातील व्यवहार, शादी डॉट कॉमकडून प्राप्त माहितीचे बारकाईने विश्लेषण करून आरोपीताचा अहमदनगर, मुंबई येथे शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही.
 
तरीदेखील तपास पथकाने अत्यंत चिकाटीने तपास करून यशवर्धनला सिल्वासा येथून अटक केली होती. त्याठिकाणी तो स्वराज सुरेश देशमुख नावाने राहत होता. परंतु, त्याच्याकडे केलेल्या चौकशी दरम्यान त्याचे खरे भाव सुमेश सुरेश पोस्कर रा. सलपेवाडी, मोजे चिंद्रावळे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर नालासोपारा, पाचगणी व भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे दाखल असल्याचे पोलिसांना समजले.
 
दरम्यान, दाखल गुन्हयाच्या तपासात माहिती व तंत्रज्ञान अधिनियम, २००० चे कलम ६६ (D) ची वाढ झाल्याने गुन्हयाचा तपास पोनि युवराज पत्की यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. युवराज पत्की यांनी पथकाच्या मदतीने तपास करुन गुन्ह्याचे दोषारोपपत्र नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यायालयात दाखल केल होते.
 
आज या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन यशवर्धन सुरेश देशमुख उर्फ सुमेश सुरेश पोस्कर या न्यायालयाने 7 वर्षे कारावास व 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने कारावास, माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (d) साठी 3 वर्ष कारावास व 1 लाख रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने दंडाची शिक्षा सुनावली.