शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मार्च 2023 (15:05 IST)

मंदिरात आढळले शेतकऱ्यांचे मृतदेह

चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मांगली गावात जगन्नाथ बाबांचे छोटेसे मंदिर आहे. या मंदिरात रात्र काढण्यासाठी आलेल्या दोन ग्रामस्थांची अज्ञातांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मधुकर खुजे आणि बापूराव खारकर अशी खून झालेल्या आरोपींची नावे आहेत.  दोघांचीही मंदिरात हत्या झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मंदिरात धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान हत्या झालेले दोघेही शेतकरी होते आणि त्यांची मंदिराशेजारीच शेती होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ते मंदिरात झोपायचे. मात्र बुधवारी रात्री मंदिरात झोपेत असताना त्यांची हत्या करण्यात आली. 
  
मृत व्यक्तींची हत्या कशी झाली याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. महत्वाचे म्हणजे मंदिरातील दानपेटी गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.