रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 ऑक्टोबर 2024 (12:06 IST)

नाशिकात प्रभू श्रीरामाच्या 70 फूट उंच मूर्तीचे अनावरण

Ram idol in nashik
social media
नाशिकात पंचवटी परिसरात तपोवनात रामसृष्टी उद्यानात शुक्रवारी भगवान श्रीरामाच्या 70 फूट उंच पुतळ्याचे अनावरण इस्कॉनचे गौरांगदास प्रभू आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले, प्रभू श्रीरामाचे शिल्पा अतिशय सुंदर अशी कल्पना साकारलेली दिसत आहे. प्रभू श्रीराम गुणांचे द्योतक आहे. 

या ठिकाणी प्रभू श्रीराम यांनी 14 वर्षाच्या वनवास काळात बराच वेळ घालवला होता. तपोवनाची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल ढिकले यांच्या प्रयत्नातून तपोवनात आकर्षक असे प्रभू श्रीरामाच्या 70 फूट उंच मूर्तीचे अनावरण करण्यात आले.

प्रभू श्रीरामाच्या शिल्प अनावरणासाठी शिंदे सरकारने निधी मंजूर केला. हे उद्यान पर्यटक हब होणार असून मूर्ती 70 फूट उंच तर भगवा झेंडा 108 फूट उंच आहे. 

या सोहळ्याच्या शेवटी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाला माजी महापौर रंजना भानसी, माजी नगरसेवक हेमंत शेट्टी, अरुण पवार, प्रियांका माने, रुची कुंभारकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
Edited By - Priya Dixit