मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 फेब्रुवारी 2025 (16:33 IST)

गडचिरोलीत बोर्ड परीक्षेत नकल रोखण्यासाठी 9 भरारी पथक तैनात

exam
राज्यात 11 फेब्रुवारी पासून बोर्ड परीक्षा सुरु होणार आहे. या आधी राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने आयोजित केली जाणारी बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी पासून आणि इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. परीक्षेत नकल रोखण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाले आहे. 
गडचिरोली जिल्ह्यात 28 हजारांहून अधिक उमेदवार इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणार आहे. या मध्ये दहावीसाठी 15 हजारांहून आणि इयत्ता बारावीसाठी 13 हजारांहून अधिक विद्यार्थी बसणार आहे. जिल्ह्यातून एकूण 124 परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहे. बारावीसाठी 50 आणि दहावीसाठी 74 परीक्षा केंद्रे बनवण्यात आली आहे. 
बोर्डाच्या परीक्षेमध्ये नकल रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने पूर्ण तयारी केली आहे. परीक्षा केंद्रावर नकल रोखण्यासाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे. या साठी फ्लाईंग  स्क्वॉड पथके तयार करण्यात आली आहे. 
राज्यातील आदिवासी बहुल भागात आणि गडचिरोली जिल्ह्यात एकूण 57 संवेदनशील परीक्षा केंद्रे आहे. त्यापैकी 27 परीक्षा केंद्रे बारावीसाठी आणि 30 परीक्षा केंद्रे 10 साठी आहे. या संवेदनशील परीक्षा केंद्राच्या परिसराचे निरीक्षण ड्रोनच्या मदतीने केले जाईल.परीक्षा केंद्रांवर शिक्षण विभागाकडून 7 भरारी पथके आणि जिल्हा प्रशासनाकडून 2 भरारी पथके नियुक्त केली आहे. 
 
परीक्षा केंद्रांवर नकल रोखण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाईल. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्याचे निर्देश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहे. 
Edited By - Priya Dixit