सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या

sangli suicide 9 member of family
Last Modified सोमवार, 20 जून 2022 (15:53 IST)
सांगली जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. माणिक यल्लप्पा व्हनमोरे आणि त्याचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्या कुटुंबाचा यात समावेश आहे.

कुटुंबाने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सुरुवातील या सगळ्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे सांगितले जात होते मात्र हे कुटुंब आर्थिक कारणांमुळे तणावत असल्यामुळे सर्वांनी आत्महत्या केल्याची पुष्टी होत आहे. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे.

म्हैसाळ येथील डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्या कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. मृतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे, रेखा मानिक वनोरे, प्रतिमा वनमोरे, आदित्य वनमोरे आणि पोपट येलाप्पा वनमोरे, अर्चना वनमोरे, संगीता वनमोरे, शुभम वनमोरे यांचा समावेश आहे.
आर्थिक कारणांमुळे हे कुटुंब तणावात होते आणि त्यामुळे आलेल्या नैराश्यातून कुटुंबातील 9 सदस्यांनी एकत्रितपणे आत्महत्या केल्याचे समजते.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

Sini शेट्टी मिस इंडिया 2022 बनली

Sini शेट्टी मिस इंडिया 2022 बनली
VLCC ने 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022' सादर केला, ज्यातील विजेत्याची रविवारी रात्री ...

माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स

माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ईडीने समन्स बजावले आहे. पांडे यांना ईडी ने ५ ...

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्र ...

'आरे’चा विरोध प्रायोजित : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'आरे’चा विरोध  प्रायोजित : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवणीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते ...

.शिवसेना-शिंदे गटाची परस्परविरोधात तक्रार

.शिवसेना-शिंदे गटाची परस्परविरोधात तक्रार
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली आहे. पण, शिवसेनेनं व्हीप बजावला होता. तो व्हीप ...