मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (15:05 IST)

फेसबुकची ओळख; पहिला विवाह झाल्याचे लपवून दुसरे लग्न

पहिला विवाह झाल्याचे लपवून दुसरे लग्न करुन महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक मुंबईनाका परिसरात एकाने फेसबुकच्या माध्यमातून आपला घटस्फोट झाल्याचे सांगून ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली असून त्यानंतर मुंबई नाका पोलिसांनी संशयित आरोपी तसेच त्याचे आई-वडील (रा. फ्लॅट नं. ५, स्नेह संकुल सोसायटी, भाऊसाहेब हिरेनगर, नाशिक-पुना रोड) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
 
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपीने फेसबुकच्या माध्यमातून या महिलेसोबत ओळख निर्माण केली. या ओळखीनंतर दोघांची जवळीक वाढली. यानंतर संशयिताने कायदेशीर घटस्फोट झाल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांच्या संमतीने, संशयित आरोपीच्या आई-वडिलांनी संगनमताने आरोपीचे फिर्यादी महिलेसोबत लग्न लावून दिले. फिर्यादी महिला ही आपली कायदेशीर पत्नी नसल्याचे माहित असताना देखील, शारीरिक संबंध प्रस्थापित करून वेळोवेळी महिलेवर बलात्कार केला. तसेच फिर्यादी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ देखील केला. ही सर्व तक्रार पीडित महिलेने केली आहे. या घटनेचा पोलिस उपनिरीक्षक बाळू पोपटराव गिते हे अधिक तपास करत आहे.