1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जानेवारी 2024 (09:30 IST)

राज्यात ९५ नव्या कोरोना रुग्णांचे निदान

covid
राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढण्याची चिन्ह आहेत. कारण जेएन. १ या व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत चालल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राज्यात सध्या जेएन. १ चे २५० सक्रिय रुग्ण आहेत. तसेच शुक्रवार १२ जानेवारी रोजी राज्यात ९५ नव्या रुग्णांचे निदान झाले. त्याचप्रमाणे आज १४६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
 
कोरोना विषाणू काळानुरुप स्वत:मध्ये बदल करत असल्याने जगभरातील शास्त्रज्ञांकडून जीनोम सीक्वेंन्सिंग आणि संशोधन सुरु आहे. कोरोनाचा अभ्यास करणार्‍या संशोधकांनी म्हटले आहे की, लसीकरण आणि रोगप्रतिकारक शक्तीमुळे आपल्या शरीराला कोविड-१९ विषाणूची सवय झाली आहे. नवीन व्हेरियंटचा संसर्ग आणि गंभीर आजारांचा धोका आता लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, पण कोरोना विषाणूचे जेएन. १ बदलेलं स्वरूप एक भीतीदायक आहे. जगभरात जेएन. १ अतिशय वेगाने पसरत असून हे भविष्यातील धोक्याचा अलर्ट असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Edited By -  Ratnadeep ranshoor