शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जानेवारी 2024 (09:19 IST)

राज्यात कोरोनाचे नवीन 67 रुग्ण,2 हजार 728 कोविड चाचण्या

राज्यामध्ये सोमवारी कोरोनाचे 61 नवीन रुग्ण आढळले असून 70 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.17 टक्के इतकं आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर 1.81 टक्के इतका आहे.
 
सोमवारी राज्यामध्ये कोरोनाच्या 2 हजार 728 चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी आरटीपीसीआर चाचण्या 1 हजार 423 इतक्या झाल्या तर आरएटी चाचण्या 1 हजार 305 झाल्या. राज्यात सोमवारचा पॉझिटिव्हीटी दर 2.23 टक्के इतका आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहतीनुसार, सध्या राज्यामध्ये जेएन.1 व्हेरिएंटचे 250 रुग्ण आहेत. यामध्ये पुण्यात सर्वाधिक 150 रुग्ण आहेत. त्याखालोखाल नागपूर 30, मुंबई 22, सोलापूर 9, सांगली आणि ठाणे प्रत्येकी 7 रुग्ण आहेत. इतर जिल्ह्यात कमी प्रमाणात रुग्णसंख्या आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor