रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 21 डिसेंबर 2023 (11:08 IST)

JN1: या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी बुस्टर डोझ घेणं किती गरजेचं?

केरळ राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला असून जेएन1 असं या व्हेरिएंटचं नाव आहे. या घटनेनंतर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
 
महाराष्ट्रातही आज (20 डिसेंबर) कोव्हिडचे 14 नवीन रुग्ण सापडले आहेत.
 
केंद्र सरकारनेही प्रत्येक राज्याला या व्हेरिएंट पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय संपूर्ण प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.
 
केरळमध्ये शनिवारी (16 डिसेंबर) कोव्हिडमुळे चार जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या चाचण्यांमुळे कोव्हिडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे, कोरोनाविरोधातल्या सर्व मान्यताप्राप्त लशी या नव्या व्हेरिएंटपासूनही संरक्षण करू शकतील.
 
सक्रिय प्रकरणांपैकी किती प्रकरणं नव्या जेएन1 या व्हेरिएंटशी संबंधित आहेत याची माहिती उपलब्ध नाही.
 
विषाणूचे वेगवेगळे प्रकार ओळखण्यासाठी जीनोम अनुक्रम पाहिला जातो.
 
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.
 
या महिन्यात केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत जेएन1 या व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
त्यांच्या मते, भारतात कोरोना-19 वर वर देखरेख ठेवणार्‍या इंसाकॉग या प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या नियमित सर्वेक्षणात हा नवा व्हेरिएंट आढळून आला.
 
जेएन 1: याची लक्षणं काय आहेत? कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे?
केरळमधील 79 वर्षीय महिला रुग्णाला सौम्य इन्फ्लूएंझा सारखी लक्षणे होती. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येत आहे.
 
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं की, अशी प्रकरणं देशाच्या इतर भागांमध्ये आधीच अस्तित्वात आहेत.
 
त्यांनी पत्रकारांशी बोलतना सांगितलं की,"महिन्यापूर्वी सिंगापूर विमानतळावर काही भारतीयांची तपासणी करण्यात आली होती तेव्हा हा व्हेरिएंट आढळून आला होता."
 
बीबीसीचे प्रतिनिधी श्रीनिवास निम्मगड्डा यांच्याशी बोलताना तिरुपती इथले पल्मोनोलॉजिस्ट भास्कर बसू यांनी सांगितलं की, "ज्या लोकांमध्ये हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे त्यांना थंडी वाजून येते, खूप थकवा जाणवतो. ताप येण्याचीही शक्यता असते.
 
ही लक्षणं बरी होण्यासाठी त्यांना दोन ते तीन दिवस लागू शकतात. मात्र रुग्णाला पूर्ण बरं होण्यासाठी एक आठवडा लागू शकतो. यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घेऊन विश्रांती घ्यावी."
 
डॉ. बसू म्हणाले की, "हा व्हेरिएंट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेएवढा भयावह नाहीये. थोडी खबरदारी घेऊन याचं संक्रमण टाळता येऊ शकतं. याला घाबरून जाण्याची गरज नाही. याशिवाय मास्कचा वापर करावा, रस्त्यावर कुठेही थुंकू नये, थंड पदार्थ, मद्यपान, सिगारेट आदी गोष्टी टाळाव्यात."
 
डॉ.भास्कर बसू यांनी म्हटलं की, जेएन.1 चा संसर्ग झाला असेल तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे चार ते पाच दिवस संपूर्ण विश्रांती घ्यावी.
 
कर्नाटक आणि तामिळनाडू देखील केरळमधील वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांवर लक्ष ठेवून आहेत.
 
कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यास परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी भारताच्या आरोग्य मंत्रालयाने अनेक राज्यांमधील रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन केलं आहे.
 
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) देखील केरळ मधील कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
 
आयसीएमआरचे महासंचालक राजीव बहल म्हणाले, "गेल्या काही आठवड्यात केरळमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इन्फ्लूएंझा सारख्या आजाराचे नमुने देखील कोरोनाच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले होते."
 
केंद्र सरकार करणार आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये वाढ
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय की जेएन1 संसर्गाचा प्रभाव गंभीर असल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.
 
राज्यांना दिलेल्या सूचनांनुसार, हा व्हेरिएंट आरटीपीसीआर चाचणीद्वारे तपासला जाऊ शकतो. सोबतच राज्यांना यापूर्वी जाहीर केलेल्या कोरोना-19 मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. यात आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्यात याव्यात अशी विशेष विनंतीही करण्यात आली आहे. जसजसा वेळ जाईल तसतसे नवीन व्हेरिएंट शोधण्याचा प्रयत्न केला जाईल.
 
ज्या रुग्णांना इन्फ्लूएन्झासारखे आजार आणि गंभीर तीव्र श्वसनाचे आजार झाले आहेत अशांना जिल्हा स्तरावरील रुग्णालयांमध्ये विशेष देखरेखी खाली ठेवावे अशी सूचना करण्यात आली आहे.
 
येणार्‍या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घ्यावी, लोकांनी खोकताना किंवा शिंकताना योग्य ती काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय की जेएन1 व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णाला मान्यताप्राप्त लस देता येऊ शकते.
 
लोक किती सतर्क आहेत?
JN1 व्हेरिएंट बद्दल लोक किती सजग आहेत हे कोव्हिड तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉक्टर अनीश टी.एस यांच्या विधानावरून स्पष्ट होतं.
 
त्यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, “आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या 100 केसेसमध्ये 50 टक्के लोकांमध्ये कोणतीही लक्षणं दिसली नाहीत. काही लोकांनी त्यांच्या नातेवाईकांची अगदी दुरून भेट घेतली होती. हे लोकही टेस्ट करवून घेत आहेत. ते घाबरले आहेत. लोक खासगी किंवा सरकारी रुग्णालयात जात आहेत.” डॉ. अनीश तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये कम्युनिटी मेडिसिन विषयाचे सहयोगी प्राध्यापक आहेत.
 
खासगी क्षेत्राचा विचार करायचा झाला तर तिथे टेस्टिंग करून घेण्याबद्दल लोक बरेच जागरूक आहेत. सर्जरी आधी किंवा नियमितपणे ज्या चाचण्या होत्या त्या आणि कोव्हिडच्या मिळून 82 टक्के टेस्ट्स होत आहेत.
 
यात 50 टक्के केसेसमध्ये नवीन व्हेरिएंटची लक्षणं दिसून येत आहेत. हा व्हेरिएंट अतिशय संक्रामक असल्याचं सांगितलं जात आहे.
 
नवीन व्हेरिएंट किती धोकादायक?
प्रसिद्ध व्हायरॉलॉजिस्ट डॉ.टी. जेकब जॉन यांनी बीबीसीला सांगितलं, “हा व्हेरिएंट फार घातक नाही. मात्र तो फार वेगाने पसरतो. 40 पेक्षा अधिक देशात तो आतापर्यंत पसरला आहे. ओमिक्रॉनच्या वेळी आपण जाणतोच. त्यामुळे आता फारशी चिंता करण्याची गकज नाही. हा विषाणू शिंकेतून निघालेल्या कणांमुळे हवेत पसरतो. ओमिक्रॉनच्या दुसऱ्या व्हेरिएंटच्या तुलनेत नाक आणि घशातून निघणाऱ्या द्रवात विषाणूंची संख्या जास्त असते.
 
वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये मायक्रोबायलॉजीचे प्राध्यापक असलेल्या डॉ. गगनदीप कांग यांनी बीबीसीला सांगितलं, “हा विषाणू इन्फ्लुएन्झा पेक्षा जास्त धोकादायक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि इतर व्याधींनी त्रस्त असलेल्या लोकांनी काळजी घेण्याची नितांत गरज आहे. जर तुम्हाला श्वासाचे विकार जास्त असतील तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही मास्क घाला. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकतो.”
 
चार लोकांचा मृत्यू, तीन लोकांचं वय 65 पेक्षा जास्त
डॉक्टर कांग जे म्हणाले, त्याचच डॉ.अनीश यांनी समर्थन केलं आहे. ते म्हणतात, “मंगळवारपर्यंत अक्टिव्ह केसेसची संख्या 1749 होती. त्यापैकी 30 ते 35 प्रकरणात लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याआधी अडीचपट रुग्णांना हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजनची गरज आहे.”
 
चार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एकाचं वय 65 वर्षांपेक्षा कमी आहे. त्यांचं वय जास्त होतं. त्यांना काही ना काही आजार होता.
 
ते म्हणतात, “एकाने कँसरचा उपाय केला होता. एक किडनीचा रुग्ण होता जो डायलिसिसवर होता. एकाला बराच काळ डायबेटिज होता.”
 
संक्रमित लोकांमध्ये 30 टक्के लोक लस घेत नाहीत
 
डॉ. अनीश यांनी सांगितलं, “केरळमध्ये 70 टक्के जनता एक तरी लस घेतली आहे. ज्या लोकांनी लस घेतली नाही त्यांची संख्या तीन टक्के आहे. मात्र जे लोक संक्रमित आहेत त्यापैकी तीस टक्के लोक या तीन टक्क्यांपैकी आहेत.”
 
ते म्हणाले, “यावरून हे स्पष्ट होतं की त्याचा अजुनही फायदा होतोय हे स्पष्ट आहे. ICMR ने केलेल्या संशोधनानुसार लशीमुळे लोकांचा मृत्यू होत नाही आणि दोन लशी जास्त घेतल्या तर जीव वाचू शकतो. मात्र पुढच्या डोसमुळे जीव वाचेल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.”
 
विषाणूमुळे संक्रमित झालेल्या लोकांमध्ये ज्या अँटीबॉडीज तयार झाल्या त्या तशाच राहतील का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “हे म्हणजे तुमच्याकडे मुख्य दरवाज्याची किल्ली आहे आणि इतरांची नाही. मात्र बहुतांश आजारांमध्ये असंच होतं. कोव्हिड साथीचा रोग आहे. जर तुम्ही लस घेतली असेल तरीही व्हेरिएंट संसर्ग पसरवण्याची शक्यता आहे. जेएन-1 बरोबरही असं होऊ शकतं. आम्हाला जितकी माहिती आहे त्यानुसार वय आणि आजार यांच्याबाबतीत वेगळी वागणूक दाखवते.”
 
बुस्टर डोझ घेणं गरजेचं आहे. या प्रश्नावर जॉन सांगतात, “याची गरज नाही.”
 
ते म्हणतात, “आधी संसर्ग झाला असेल किंवा आधीच्या लशीच्या डोझमुळे प्रतिकारक क्षमता वाढली असेल तर जीव वाचण्याची शक्यता तितकीच जास्त असते. कोणत्याही लशीचा बुस्टर डोज सगळ्यात सुरक्षित असतो.”
 
बाकी ठिकाणासारखंच जेएन-1 व्हेरिएंटला टार्गेट करणी लस अद्याप तयार झालेली नाही.
 
डॉक्टर कांग अमेरिकेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या आजाराशी लढणाऱ्या लोकांसाठी मोनोवॅलँट लशीचा उल्लेख करतात.
 
त्या म्हणतात, “ते जुन्या आणि नवीन स्ट्रेनशी लढण्यासाठी बायवँलेट लशी तयार करत होते. आता अमेरिकेला जुन्या स्ट्रेनची चिंता नाही. कारण जुना स्ट्रेनच आता अस्तित्वात नाही.”
 
त्या म्हणतात, “सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नोवोवॅक्स लस तयार केली आहे. ही मोनोव्हॅलेंट स्ट्रेनसाठी ताजी लस आहे. त्यामुळे यापासून काही प्रतिकारक क्षमता वाढेल अशी अपेक्षा आहे.”
 
डॉ. गगनदीप कांग म्हणतात, “जर तुम्ही निरोगी असाल, लस घेतली असेल आणि त्यानंतरही संसर्ग झाला असेल तर दुसऱ्या लशीचा फायदा होत नाही. ज्या लोकांना जास्त धोका आहे त्यांनाच लशीचा फायदा होतो. त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. बुस्टर डोझचा फायदा काही महिन्यांपर्यंतच होतो.”
 
बुस्टर डोझ घेणं गरजेचं आहे. या प्रश्नावर जॉन सांगतात, “याची गरज नाही.”
 
ते म्हणतात, “आधी संसर्ग झाला असेल किंवा आधीच्या लशीच्या डोझमुळे प्रतिकारक क्षमता वाढली असेल तर जीव वाचण्याची शक्यता तितकीच जास्त असते. कोणत्याही लशीचा बुस्टर डोज सगळ्यात सुरक्षित असतो.”
 
बाकी ठिकाणासारखंच जेएन-1 व्हेरिएंटला टार्गेट करणी लस अद्याप तयार झालेली नाही.
 
डॉक्टर कांग अमेरिकेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या आजाराशी लढणाऱ्या लोकांसाठी मोनोवॅलँट लशीचा उल्लेख करतात.
 
त्या म्हणतात, “ते जुन्या आणि नवीन स्ट्रेनशी लढण्यासाठी बायवँलेट लशी तयार करत होते. आता अमेरिकेला जुन्या स्ट्रेनची चिंता नाही. कारण जुना स्ट्रेनच आता अस्तित्वात नाही.”
 
त्या म्हणतात, “सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नोवोवॅक्स लस तयार केली आहे. ही मोनोव्हॅलेंट स्ट्रेनसाठी ताजी लस आहे. त्यामुळे यापासून काही प्रतिकारक क्षमता वाढेल अशी अपेक्षा आहे.”
 
डॉ. गगनदीप कांग म्हणतात, “जर तुम्ही निरोगी असाल, लस घेतली असेल आणि त्यानंतरही संसर्ग झाला असेल तर दुसऱ्या लशीचा फायदा होत नाही. ज्या लोकांना जास्त धोका आहे त्यांनाच लशीचा फायदा होतो. त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. बुस्टर डोझचा फायदा काही महिन्यांपर्यंतच होतो.”