शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (07:34 IST)

का केली आश्रमशाळेतील दहावीत शिकणा-या विद्यार्थीनीने आत्महत्या?

suicide
पेठ तालुक्यातील चोळमुख शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. भारती जगन्नाथ बेंडकोळी (१६) हे आत्महत्या करणा-या विद्यार्थीनीचे नाव आहे. दहावीच्या वर्गात ती शिक्षण घेत होती. या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. 

चोळमुख येथे निवासी वस्तीगृहातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पोलिस निरीक्षक विशाल जगन्नाथ जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.