रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (08:57 IST)

अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या भावाने पुण्यात आत्महत्या केली

नोकरी न मिळण्याच्या भीतीने सुप्रसिद्ध गायिका तथा अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या चुलत भावाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी १५ जुलै रोजी हिंजवडी पोलीस ठाण्याचे हद्दीतील सुसगाव येथे उघडकीस आली. अक्षय अमोल माटेगावकर (२१, रा. माउंट युनिक सोसायटी, सुसगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अक्षय हा संगणक अभियंता असून सुप्रसिद्ध गायिका केतकी माटेगावकर यांचा चुलत भाऊ होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी त्याने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहीती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी मिळून आली आहे. आयटी कंपनीत ‘प्लेसमेंट’ मिळणार नसल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठी नमूद आहे. अधिक तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत. याबाबत केतकी माटेगावकर यांचे वडील पराग माटेगावकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला.