1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (23:30 IST)

अभिनेत्रींच्या भावाने चिट्ठी लिहून इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली

ketki mategaonkar
प्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्देवी आणि धक्कादायक घटना पुण्यातील सुसगाव येथे घडली आहे. अक्षय अमोल माटेगावकर असे या मयत तरुणाचं नाव आहे हा तरुण 21 वर्षाचा होता.आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलं होतं. मयत अक्षयच्या जवळून सोसाइड नोट सापडली असून त्यात त्यांनी मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही मला काही नौकरी मिळणार नाही, म्हणून मी आपलं आयुष्य संपवत आहे. या घटनेमुळे सम्पूर्ण परिसरात आणि माटेगावकर कुटुंबियात शोककळा पसरली आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहे.