रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (08:31 IST)

विवाहितेची मुलासह पेटवून घेऊन आत्महत्या

सोलापूर करमाळा तालुक्यातील गौंडरे येथे एका विवाहितेने मुलासह पेटून घेऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंजली दत्तात्रय आंबारे (साधारण वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर मुलाचे नाव समजू शकलेले नाही. घरापासून काही अंतरावर ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समजली असून नेमकी ही आत्महत्या की हत्या हे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती समजताच करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
 
गौडरे येथे मंगळवारी (ता. २८) तारखेला विवाहितेने आत्महत्या केली. विवाहितेची पती दत्तात्रय आंबारे हे गवंडी काम करत असल्याचे समजत आहे. त्यांना दोन मुले आहेत.