शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 मे 2022 (13:44 IST)

आई आणि गर्भवती लेकीने गळफास घेऊन आत्महत्या केली

suicide
सिल्लोड तालुक्यातील पळशी येथे एका विधवा महिलेने आपल्या गर्भवती लेकीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयविदारक घटना घडली आहे. ही महिला विधवा असून लेक चार महिन्याची गर्भवती होती. सुनीता भारत सावळे(47)  आणि जागृती अनिल दांगोडे (27) ते या मयत मायलेकींची नावे आहेत. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली  आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सुनीता हिच्या पतीने 2005 साली गळफास घेऊन आत्महत्या केली होती तेव्हा जागृती लहान होती. पतीच्या गेल्यावर सुनीताने आपल्या लेकीला लहानाचे मोठे करून तिचे लग्न लावून दिले. तिला राजकन्या नावाची मुलगी झाली. राजकन्या अवघ्या दीड वर्षाची असताना जागृतीच्या पतीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर जागृती माहेरी आली आणि तिला तिच्या आई ने सुनीता ने आणि इतर नातेवाईकांनी आधार देऊन तिचे पुन्हा सहा महिन्यापूर्वी लग्न लावून दिले. आणि ती चार महिन्याची गर्भवती होती. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे.

घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोट मध्ये आम्ही चौघी जणी नैराश्यातून आत्महत्या करीत आहोत .पती मला पैशांची मागणी करतो. त्यानंतर त्यांनी गळफास घेतला त्यांनी दोघानीं गळ्यात दोरी अडकवली त्यापूर्वी जागृतीने चिमुकल्या राजकन्येच्या गळ्यात देखील दोर अडकवले मात्र ती त्यातून निसटून गेली आणि फासात जागृती मात्र अडकली. ही  घटना गुरुवारी घडली आहे. नेहमी प्रमाणे मायलेकी झोपायला गेल्या मात्र सकाळी चिमुकली राजकन्या घराबाहेर रडत रडत पडली शेजारी राहणाऱ्या  महिलेने चिमुकलीच्या गळ्यात दोरीचा फास आवळलेला पहिला आणि तिने तिच्या घराच्या दिशेने धाव घेतली. घरात प्रवेश केल्यावर जागृती आणि सुनीता या दोघी फासावर लाटलेल्या आढळल्या. नागरिकांनी तात्काळ सिल्लोड ग्रामीण पोलिसांना ही  माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आकस्मिक मृत्यू ची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनास पाठविले. नंतर त्यां दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले