रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 मे 2022 (09:11 IST)

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसेला शिवसेनेसोबत येण्याची ऑफर दिली

deepali sayyad
शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसेला शिवसेनेसोबत येण्याची ऑफर दिली. तसेच यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावर सल्लाही दिला आहे.
 
यावेळी दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे, केतकी चितळे या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं.
 
त्यांनी म्हटलं, "अयोध्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हक्क आणि अधिकार आहे. भूमिका स्पष्ट नसलेले नेते स्वतःला हिंदू जननायक संबोधतात पण ते करुन दाखवू शकत नाहीत. राज ठाकरे ना खुलं आवाहन दिलं की, तुम्हाला भीती वाटत असेल तर आताही आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येला जा, जेणेकरुन तुमचा अयोध्या दौरा सक्सेस होईल.
 
"भाजपाचा स्लोगन घेवून तुम्ही अयोध्येला जात होतात. त्यामुळे आज नाही उद्या जाणार, उद्या नाही परवा जाणार आता तर जाणारच नाही."