मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (15:39 IST)

क्रिकेट खेळताना चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

नाशिकमध्ये क्रिकेट खेळताना चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सिडको भागात घडली आहे. श्रेयस सुधीर ढोरे, असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

श्रेयस हा सिडकोतल्या रणभूमी मैदानावर क्रिकेट खेळत होता. मात्र, अचानक चक्कर आल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला त्याच्या मित्रांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. श्रेयसच्या अचानक झालेल्या मृत्यूचा त्याच्या मित्रमंडळींना चांगलाच धक्का बसला आहे.