सोमवार, 1 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (12:22 IST)

धक्कादायक ! औरंगाबाद येथे प्राध्यापकाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या

Shocking! Professor stabbed to death in Aurangabad Maharashtra News Regional Marathi News webdunia Marathi
औरंगाबाद येथे एका प्राध्यापकाची राहत्या घरात गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ठाकरे नगर मधील सिडको N -2 भागात ही घटना घडली आहे.डॉ.राजन शिंदे असे मयत झालेल्या प्राध्यापकाचे  नाव आहे. कुटुंबियांना हा प्रकार सकाळी उठल्यावर समोर आला. रात्री झोपेत असताना अज्ञात मारेकरीने त्यांचा गळा चिरून खून केला.
 
शिंदे हे मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रेजीचे प्राध्यापक होते.हे एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होते. असे असताना देखील रात्री झोपेत त्यांचा कोणी खून केला. हा धक्कादायक प्रकार सकाळी उठल्यावर कुटुंबियांच्या लक्षात आला.त्यांनी त्वरितच मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास करताना घरातून काहीही चोरी झाल्याचे आढळले नाही.पोलीस प्रकरणाचा तपास लावत आहे.