रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (10:00 IST)

माणुसकीला काळिमा :पुजाऱ्याचे विवाहितेवर 6 वर्षे अत्याचार, विवाहितेच्या मुलीवरही अतिप्रसंग केला

नांदेड मध्ये एका पुजाऱ्याने एका विवाहितेवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पुजाऱ्याने 'देवा ने मला तुझ्यासाठीच पाठवले आहे मी महाराज आहे मी सांगितल्या प्रमाणेच तुला वागावे लागणार'. असे म्हणत सहा वर्षांपासून या विवाहित महिलेवर अत्याचार केले आहे.एवढेच नव्हे तर या नराधमाने पीडित महिलेच्या 20 वर्षाच्या मुलीवर देखील अतिप्रसंग केला. माणुसकीला काळिमा लावणारी ही घटना नांदेड येथील गोपाळ चावडी परिसरातील आहे.पीडित महिलेने या प्रकरणाची नोंद नांदेड पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी पुजाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
हा पुजारी नांदेड शहरातील गोपाळ चावडीत एका देवीमंदिरातील पुजारी आहे. त्याचे नाव श्रीपाद देशपांडे असून तो पीडित महिलेवर  2015 पासून अत्याचार करत आहे. एकदा पुजारी महिलेच्या घरी आला तेव्हा ती अंघोळीला गेली असताना पुजाऱ्याने तिचे चित्र काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिचावर अत्याचार केले असं तो सहा वर्षापासून करत होता.तिने याचा विरोध केले असता मला 'देवाने खास तुझ्यासाठी पाठवले आहे.मी महाराज आहे.माझे तुला ऐकावेच लागणार 'असं म्हणत अत्याचार केला. पुजाऱ्यापासून ती गरोदर देखील राहिली पण या नराधमाने तिचे गर्भपात केले. 
 
पीडित महिला त्याचे अत्याचार सहन करत होती. पण एवढावरच हा नराधम थांबला नाही तर त्याने पीडितेच्या 20 वर्षाच्या मुलीवर देखील अति प्रसंग केला. त्याच्या जाचाला कंटाळून तिने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पुजाऱ्याच्या विरोधात तक्रार केली आहे.पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास करत आहे.