सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 जुलै 2024 (15:41 IST)

अमरावतीत 17 वर्षाच्या मुलीची उंच इमारतीवरून उडी घेत आत्महत्या

suicide
अमरावती येथे 17 वर्षीय मुलीने इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती शहरातील तापडिया मॉलच्या मागील असलेल्या एका इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून एका 17 वर्षीय तरुणीने सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. घटना घडल्यावर स्थानिकांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

ही तरुणी चंदननगर येथील रहिवासी असून तिच्या घरी हार्डवेअरचे दुकान होते. घटनेच्या दिवशी दुपारी 3 वाजेच्या सुमारास तरुणी वडिलांची गाडी घेऊन इमारतीजवळ पोहोचली. तिथे तिने 11 व्या मजल्यावरून टेरेस वरून उडी घेत आत्महत्या केली. तिचा दुर्देवी मृत्यू झाला. 

हा प्रकार पाहून लोकांनी घटनास्थळ पोहोचून प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेत प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी मृत तरुणीचा मोबाईल जप्त केला आहे. मोबाईलवरून काही माहिती मिळते का याचा तपास केला जात आहे. तरुणीने आत्महत्या का केली अद्याप हे कळू शकले नाही. 

तरुणी शिकवणी साठी जाण्यासाठी निघाली नंतर इमारतीवरून उडी घेतली. आई वडिलांना वाटले की ती कोचिंग साठी गेली आहे मात्र तिच्या पालकांना पोलिसांनी फोन वरून ही माहिती दिली. पालकांनी घटनास्थळी पोहोचून मुलीचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. पोलिसांनी प्रकरणाची नोंद आकस्मिक मृत्यूची केली आहे. मुलीने असे टोकाचे पाऊल का घेतले पोलीस याचा शोध घेत आहे. 
 
Edited By- Priya Dixit