शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 27 जुलै 2024 (14:45 IST)

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात पावसाचा ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या मुंबई-दिल्लीचे हवामान

monsoon update
Weather Today: हवामान विभागाने आज देशामध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्राच्या घाट असलेल्या परिसरांमध्ये आज रेड अलर्ट घोषित केला आहे. मुंबईमध्ये आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
 
आज 27 जुलै ला पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, ओडिसा, छत्तीसगड, कर्नाटक, किनाऱ्यावरील परिसरांना तसेच कोकण, गोवा, पूर्व राजस्थान, कर्नाटकच्या परिसरांना तसेच उत्तराखंड मध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. याशिवाय हवामान खात्याने 27 जुलै ला महाराष्ट्राच्या घाट परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा व्यक्त केला आहे. तसेच 27 आणि 28 जुलै कोकण, 26,27,28 जुलै मध्य महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
 
महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि ठाणे मध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर सोबतच येलो अलर्ट घोषित केला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा मध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो. गाजियाबाद, गुरुग्राम, फरिदाबाद मध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे तर राजधानी दिल्ली मध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.