गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 23 जुलै 2024 (11:29 IST)

पावसाचा हाहाकार, महाराष्ट्र-गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

rain
देशभरामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतात अनेक राज्यामध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे. लोकांना अनेक समस्यांचा सामाना करावा लागत आहे. मान्सून विभागाने 23 जुलै ला मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, ऊत्तराखंड, ओडिसा, गोवा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 
 
राजधानी दिल्लीमध्ये 24 जुलै पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच येत्या 24 तासांमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, ऊत्तराखंड, ओडिसा, गोवा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 
 
तसेच यासोबतच हिमाचल प्रदेश मध्ये चक्रीवादळाचे क्षेत्र बनले आहे. तसेच गुजरातच्या कच्छ क्षेत्रात चक्रवाती हवेचे क्षेत्र बनले आहे. 
 
याशिवाय पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर केरळ, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.