शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (07:46 IST)

टेरेसवरून उडी मारून एका १९ वर्षीय डिएडच्या विध्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना

suicide
लातूर: (एमआयडीसी) येथे असलेल्या सावंत अपार्टमेंटच्या टेरेसवरून उडी मारून एका १९ वर्षीय डिएडच्या विध्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी  घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची सायंकाळी नोंद करण्यात आली आहे. अविनाश व्यंकटराव सानप असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
 
पोलिसांनी सांगितले, एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या समांतर मार्गलगतच्या सावंत अपार्टमेंटमध्ये अविनाश आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत वास्तव्याला होता. सध्याला तो डिएडच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे आई-वडील हे शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ते सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यापाठोपाठ बहिणही शिक्षणासाठी घराबाहेर पडली. दरम्यान, अविनाश हा घरात एकटाच होता. गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अविनाश सानप याने अपार्टमेंटच्या टेरेसवर गेला आणि तेथून उडी मारली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. सानप कुटुंब हे निलंगा तालुक्यातील नदी हत्तरगा येथील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी दिली. अविनाश सानप याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. मात्र, अविनाशचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

Edited by : Ratnadeep Ranshoor