शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (07:43 IST)

महिलेच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड सदृश दाहक पदार्थ फेकून तिला जाळण्याचा प्रयत्न

वर्धा: तिकिट काऊंटरवर बसणाऱ्या महिलेच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड सदृश दाहक पदार्थ फेकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना १३ ऑक्टोबर रोजी शहरातील मुख्य समजल्या जाणाऱ्या महावीर बालोद्यानात रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. हल्ल्यात महिलेची पाठ आणि हात काही प्रमाणात भाजल्याने तिच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी विकृत आरोपीस बेड्या ठोकल्या. अर्जून चाफले (५२) रा. असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
अजूर्न चाफले हा शहरातील महारवीर बालोद्यानात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीवर होता. याच उद्यानात पीडिताही नोकरीवर होती. एकतर्फी प्रेमातून मद्यधूंद असलेल्या अर्जून चाफले याने उद्यानातच पीडितेच्या चेहऱ्यावर अॅसीड सदृश दाहक पदार्थ फेकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने लगेच ओढणी समोर केल्याने सुदैवाने तिला मोठी इजा पोहचली नाही. पीडितेच्या हातावर आणि पाठीवर दाहक पदार्थ फेकल्या गेल्याने काही प्रमाणात तो भाग भाजला.
 
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी केली. रामनगर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अर्जून चाफले यास अटक केली असून पीडितेवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती दिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor