शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (13:45 IST)

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थिनीचा मृत्यू

death
पुण्यात MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 25 वर्षीय विद्यार्थिनीचा अभ्यासिकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वडगाव शेरी येथे घडली. पूजा वसंत राठोड असे या मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. मूळची सोलापुरातील पूजा आपल्या बहिणीसह पुण्यात राहत असून MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. 
पूजा मंगळवारी स्टडी सेंटरच्या अभ्यासिकेत अभ्यास करत बसली असताना अचानक तिला हृदय विकाराचा झटका आला आणि ती जागेवर कोसळली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.तिला हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन तिचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली असून तिच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्यावर तिच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 
 
Edited By - Priya Dixit