गुरूवार, 22 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (08:14 IST)

पुणे संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त

Police deployment at sensitive places in Pune
पुणे (पीएफआय) या संघटनेवर बंदी घालण्यात आल्यानंतर कोंढवा भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्था अबधित ठेवण्यासाठी संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
‘पीएफआय”संघटनेच्या कोंढवा भागातील कार्यालयावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गेल्या गुरुवारी (२२ सप्टेंबर) छापा टाकला. एनआयएच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. एनआयएच्या पथकाने पुण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागात कारवाई केली. ‘पीएफआय’वर केंद्रशासनाने पाच वर्षांची बंदी घालण्यात आल्यानंतर शहरातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कोंढवा भागातील बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.