शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 एप्रिल 2023 (07:32 IST)

बुलढाण्यात १० वर्षीय चिमुकलीवर ४० वर्षीय मामाचा बलात्कार

rape
४० वर्षीय वासनांध मामाने स्वत:च्या दहा वर्षीय भाचीवर अत्याचार केला. ही घटना खामगाव शहरात उघडकीस आली. त्यामुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी वासनांध मामाला अटक केली आहे.
 
याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पुणे येथे कामाला असलेला एक ४० वर्षीय युवक खामगाव येथे बहिणीकडे आला होता. दरम्यान, ८ एप्रिलच्या रात्री त्याने आपल्या १० वर्षीय भाचीला तोंड दाबून बाजूच्या खोलीत उचलून नेले व तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. हे दुष्कृत्य केल्यानंतर तो तेथून पळून गेला. ही घटना पीडित मुलीने तिच्या आईला सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून, पोलिसांनी याप्रकरणी नराधम मामाविरुद्ध भादंवि कलम ३७६ (ए), ३७७, ३७६ (आय), सहकलम ४, ६, ८ पॉक्सो अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor