1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (17:05 IST)

रेल्वेत चढताना पाय घसरला, जवानामुळे महिलेचे प्राण वाचले

leg slipped while boarding train
अनेक वेळा रेल्वे स्थानकावर चालत्या रेल्वेत चढताना अनेकांचे जीव धोक्यात आलेच्या घटना समोर आल्या आहेत. तरी प्रवासी धावपळीत आपला जीव धोक्यात घालतात. असाच प्रसंग  रेल्वे स्थानकावर बघायला मिळाला. पण रेल्वे आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला. 
 
शेगाव रेल्वे स्थानकावर गांधीधाम ते विशाखापट्टणम् रेल्वे जात असताना एक महिला प्रवासी आपल्या कुटुंबासोबत चालत्या ट्रेमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र अचानक त्यांचा पाय घसरुन त्या रेल्वे आणि प्लॅटफार्ममधील गॅपमध्ये पडल्या. घटनास्थळी उपस्थित आरपीएफ जवान भागवत सरकटे यांच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले. जवान सरकटे यांनी जीवाची पर्वा न करता महिलेला बाहेर ओढून काढले. संगीता सुईवाल असे त्या महिलेचं नाव असून त्या अकोला येथील रहिवासी आहे. 
 
ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.