शनिवार, 4 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (21:15 IST)

तु फुकट सरपंच झाली” असे म्हणत १४ ते १५ जणांनी घरात घुसून महिला सरपंचाला बेदम मारहाण

Sarashiv village in Mehkar taluka of Buldhana district
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सारशिव गावात “तु फुकट सरपंच झाली” असे म्हणत १४ ते १५ जणांनी घरात घुसून महिला सरपंचाला बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर टोळक्याने सरपंच महिलेच्या मुलांना देखील मारहाण केली.
 
या टोळक्याविरुद्ध महिला सरपंच रमाबाई जाधव यांनी सुरुवातीला जानेफळ पोलीस स्टेशन गाठले. मात्र, त्या ठिकाणी त्यांची दखल घेतली नाही. त्यानंतर थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या सरपंच महिलेने तक्रार दाखल केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यलयातून तक्रार घेऊन त्या महिलेला पुन्हा जानेफळ पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले.
 
मात्र, या महिला सरपंचाला जानेफळ पोलिसांनी बराचवेळ ताटकळत ठेवले. मारहाण करणार्‍यांवर गुन्हे दाखल करत कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे महिला सरपंच हतबल झाल्या आहेत. मारहाणीत हात फ्रॅक्चर झाला असल्याचा आरोप महिला सरपंचाने केला आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor