शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (20:40 IST)

मद्यप्रेमींसाठी राज्य सरकारकडून न्यू इअर गिफ्ट, पहाटे 5 वाजे पर्यंत दारूची दुकानं सुरु राहणार

drink
राज्य सरकार कडून मद्य प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 24 ,25 आणि 31 डिसेंबर रोजी दारूची दुकानं पहाटे 5 वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला असून यंदा मद्य प्रेमींची थर्टीफस्ट पार्टी दणक्यात साजरी होणार आहे. मद्यप्रेमींना आता 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजे पर्यंत मद्य विकत घेता येऊ शकत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण 31 डिसेंबर रोजी मद्यपान करतात आणि नववर्षाचे स्वागत दणक्यात करण्यासाठी पार्टी करतात. या काळात मद्याची मागणी असते. मद्याच्या विक्रीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला आर्थिक फायदा होतो.या गोष्टीचा राज्य सरकारला फायदा होऊन यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 
Edited by - Priya Dixit