रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (10:50 IST)

बाप्परे, महिलेच्या फुप्फुसातून ५ किलोचा ट्युमर काढला

मुंबईमध्ये आलेल्या ओमानमधील महिलेच्या फुप्फुसातून ५ किलोचा ट्युमर काढण्यात यश आलं आहे. या महिलेची थोरॅकोटोमी शस्त्रक्रियेच्या मदतीने डाव्या फुफ्फुसातील अतिरीक्त चरबी काढून फुफ्फुसांना वाचवण्यात आले आहेत. दोन महिन्यापूर्वीपासून त्यांना पुन्हा आरोग्यासंबंधी तक्रारी जाणवू लागल्या. श्वास घेण्यास त्रास होणे, चालताना अडखळणे, झोपेची समस्या, जेवताना येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागला. सतत खोकल्याच्या समस्येमुळे ओमानने एक्सरे काढले. फुप्फुसाच्या एक्स-रेमध्ये उती पूर्णपणे नष्ट झाली असल्याचं निदर्शनास आलं. आणि छातीच्या पोकळीत गुठळी (मास) असल्याचे दिसून आले. 
 
याविषयी अधिक माहिती देताना एसीआय कुंबल्ला हिल हॉस्पिटलचे कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. धैर्याशील सावंत यांनी सांगितलं की, “या महिलेच्या छातीच्या पोकळीत असलेल्या मांसाच्या गोळ्यामुळे तिच्या शरीरातील फुफ्फुस संकुचित झाले होते. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. छातीच्या बरगड्यांममध्ये एक छेद तयार करण्यात आला आणि फुफ्फुसाचा भागात असलेल्या मांसाच्या गुठळ्या काढून टाकण्यात आल्या. या शस्त्रक्रियेत ५ किलो (१२x१८सें.मी.) चे ट्यूमर काढून टाकल्यामुळे उजवीकडे असलेले फुफ्फुस विस्तृत होऊ लागले. ही शस्त्रक्रिया जवळपास अडीच तास चालली आणि शस्त्रक्रियेनंतर ७ व्या दिवशी महिलेला डिस्चार्ज देण्यात आला.