सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 जानेवारी 2024 (13:06 IST)

काळाचौकी परिसरात एका शाळेत 8 सिलेंडरचा मोठा स्फोट

fire
मुंबईतील लालबाग काळाचौकी परिसरात साईबाबा नगर येथे एका शाळेत 8 सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. ही शाळा बंद असल्यामुळे त्यात ठेवलेल्या सिलिंडरात मोठा स्फोट झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही शाळा गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. कोविड मध्ये या शाळेचा वापर करण्यात आला त्यांनतर ही शाळा बंदच आहे. त्या बंद शाळेत ऑसीजन सिलिंडर ठेवलेले होते. 
 
शाळा बंद असल्याने या मध्ये कोणीही नहव्ते. म्हणून मोठा अपघात टळला. आगीची माहिती मिळतातच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले  आहे. या स्फोटामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

ही आग बीएमसीच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल मध्ये लागली होती. ही शाळा कॅव्हिडच्या काळात वापरली जात असून चार वर्षांपासून बंद होती. या काळातील वापरण्यात लेले ऑक्सिजन सिलिंडर तसेच पडून होते. या ऑक्सिजन सिलिंडर मध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली .आणि आत असलेल्या गाद्यांनी पेट घेतला. आणि आग वाढली. सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.    
 
 Edited by - Priya Dixit